शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

भाजपचा पालिकेचा बार फुसका ठरेल : जयंत पाटील -सांगलीत राष्ट्रवादीच्या बैठकीत रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:00 IST

सांगली : उमेदवार आयात करून महापालिकेत सत्तेचे गणित मांडणाऱ्या भाजपचा बार फुसकाच ठरणार आहे, अशी टीका राष्ट्रवादी चे नेते आ. जयंत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली.

सांगली : उमेदवार आयात करून महापालिकेत सत्तेचे गणित मांडणाऱ्या भाजपचा बार फुसकाच ठरणार आहे, अशी टीका राष्ट्रवादी चे नेते आ. जयंत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली.राष्ट्रवादी ची जिल्हा कार्यकारिणीची बैठक येथील कार्यालयात शनिवारी सायंकाळी पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, महापालिकेत सत्तेवर येण्याचा दावा भाजप नेते वारंवार करीत आहेत. भाजपची येथील ताकद मर्यादित आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीची त्यांची मदार आयात उमेदवारांवरच असेल. त्यामुळे या निवडणुकीतही इनकमिंगशिवाय त्यांना थारा नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यासाठी वाट्टेल ती आमिषे दाखविण्याचे काम भाजप नेत्यांकडून सुरू आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना हे पचनी पडणार नाही. शिवाय पक्षात घेतलेल्यांनाही थारा नाही. त्यामुळे त्यांच्या गळाला कोणी लागणार नाही. त्यामुळेच त्यांचा सत्तेचा बार फुसकाच ठरणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबद्दल ते म्हणाले, आता कुठे प्रभागरचना झाली आहे. त्यानुसार आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून आघाडी करायची की नाही, याचा निर्णय घेऊ. रणनीती ठरविताना सर्वांना विश्वासात घेतले जाईल. राज्यातील भाजप सरकारने शेतकरी, व्यापारी सर्वांसाठीच अन्यायकारक धोरणे राबविली आहेत. यामुळे सरकारविरोधात राष्ट्रवादीने राज्यभर हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोलची सुरुवात २ एप्रिलपासून कोल्हापुरातून होत आहे. सांगली जिल्ह्यातही ४ व ५ एप्रिल रोजी सात ठिकाणी हल्लाबोल सभा होणार आहेत. येत्या २ एप्रिलला सांगली, मिरजेत हल्लाबोल यात्रेच्या सभा होणार आहेत. सभेमध्ये राज्य शासनाने महापालिकेकडे दुर्लक्ष केल्यासह एकूणच कारभाराचा पंचनामा होईल. त्यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंगच फुंकले जाणार आहे.

राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आ. पाटील यांच्या उपस्थितीत झाली. जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, अरुण लाड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, संचालक बी. के. पाटील, मनोज शिंदे, ताजुद्दीन तांबोळी, युवकचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील युवक राष्ट्रवादीच्या कामकाजाचा आढावा घेतला.

या बैठकीला जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर पाटील, अविनाश पाटील, जिल्हा परिषदेतील गटनेते शरद लाड, सुरेश शिंदे, चन्नाप्पा होर्तीकर, रमेश पाटील, आप्पासाहेब हुळ्ळे, हणमंत देशमुख, अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, किसन जानकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.जमत नसेल तर पदे सोडा!जयंत पाटील यांनी आज उपद्रवी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. मिरज तालुक्यातील युवक राष्टÑवादी अध्यक्षाने बुथ कमिट्या निवडीत वरिष्ठ नेत्यांचा हस्तक्षेप होत असल्याची तक्रार थेट जयंत पाटील यांच्याकडे केली. त्यावर नाराजी व्यक्त करताना जयंत पाटील म्हणाले की, राजकारणात अडचणी येत असतात. पक्षातही काही मंडळी जाणीवपूर्वक अडचणी आणतात. पण आवड असेल तरच राजकारणात या, हे आपले सरळ गणित आहे. ज्यांना राजकारणात टिकायचे आहे, त्यांनी धडपड केली पाहिजे. कागदोपत्री नियुक्ती करू नका, गावात जाऊन बैठका घ्या. जर तुम्हाला जमत नसेल तर पदे सोडा, असा दमही त्यांनी भरला.चमकोगिरी नको!बुथ कमिट्यांवर सक्रिय आणि मतदार खेचणारे कार्यकर्ते हवे आहेत. गावातील प्रत्येक गटाला विश्वासात घेऊन बुथ कमिट्या नेमायला हव्यात. हे काही इव्हेंट मॅनेजमेंट नव्हे. गावात फलक लावून फोटो फेसबुकवर अपलोड करणारे नको आहेत. मतदारांपर्यंत पोहोचले पाहिजे, असेही जयंतरावांनी सुनावले.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटील